पुणे, ३० मे २०२३: डीआरडीओचा संचालक प्रदीप मोरेश्वर कुरुलकर हा पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या सतत संपर्कात असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणेच्या हाती आले असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल एटीएस महासंचालकांना पाठवण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. जप्त’ केलेल्या इलेक्ट्रिनिक डिवाइसच्या फॉरेस्निक तपासणीनंतर आलेल्या अहवाल कुरुलकरच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचा मुक्काम येरवडा कारागृहात वाढला आहे.
उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘डीआरडीओ’चा संचालक प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यास पाकिस्तानी हेर ललनांनी घेरले होते. सामान्य माणसाला अचानक एखाद्या तरुणीचा कॉल यावा अन् तिने गोड बोलून जाळ्यात अलगद घ्यावे, असेच काही त्यांच्या बाबतीत घडले संरक्षण विभागाची गुप्त माहिती त्यांने पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या हवाली केली.
कुरुलकरच्या कृत्यांचे दररोज नवनवीन प्रताप समोर येत असताना त्यांने केलेल्या कृत्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणाने दोन्ही अहवालाचा आधार घेऊन तो पाकिस्तानच्या सतत संपर्कात होता असा अंतिम अहवाल सादर केला असल्याचे समजते. याबाबतचे सबळ पुरावे तपासणीच्या हाती लागले असून, आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या निष्कर्षाप्रत एटीएस आली असल्याचे समजते आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर