कुष्ठ रोग्यांचे आधार “बाबा” आमटे

कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक बाबा आमटे. बाबा आमटे यांनी जमीनदार घराण्यामध्ये जन्म घेतला. वडिलांचा वकिलीचा व्यवसाय मुरलीधर देविदास आमटे असे त्यांच्या वडिलांचे नाव होते. कुष्ठरोगी, आदिवासी, वंचितांसाठीचे ‘बाबा’ होण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या या कार्याचा संपूर्ण जगाने आदर्श घेतलेला आहे.

बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात झाला. त्यांचे वडील देविदास आमटे व आई लक्ष्मीबाई आमटे.
त्यांचे वडील मोठे सावकार होते. घरी बक्कळ संपत्ती होती. बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव ‘बाबा’ ठेवले होते. बाबा लहानपणापासूनच अत्यंत दयाळू होते. गरीबांचे दुःख त्यांना पाहवत नसे. कुटुंबात ते एकुलते एक अपत्य असल्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे. वयाच्या १४ व्या वर्षी वडीलांनी त्यांना एक बंदुक भेट दिली होती. त्या बंदूकीने बाबा छोटया-मोठया जंगली प्राण्यांची शिकार करत.
बाबा १८ वर्षाचे असताना त्यांना वडीलांनी एक अ‍ॅम्बेसिडर कार भेट दिली होती. त्यांना अस्पृश्य मूलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली नाही. स्वतः बाबांनाही जाती व्यवस्था मान्य नव्हती.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वर्धा येथून कायद्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी जेव्हा वर्ध्यात सेवाग्राम येथे आले होते, तेथे ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात याचा मोठा प्रभाव पडला.
पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्विकार करून खादी कपडेच घालायचे ठरविले. अनेक नेत्यांच्या तुरूंगवासादरम्यान त्यांची कायद्याची बाजू बाबाच सांभाळत. गांधीजींनी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले होते.

१९७३ साली गडचिरोली जिल्हयातील मदिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला.
बाबा आमटे हे आपल्या जीवनाअखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासून रोखण्यास लोकांना प्रेरीत केले.
त्यांना त्यांच्या कुटुंबाची त्यांना खूप मदत मिळाली. त्यांच्या पत्नी इंदु घुले, त्यांना ते साधना असे म्हणत असत. नेहमी त्या बाबांबरोबर राहिल्या. त्यांचे दोन मुले आहेत. डाॅ. विकास आमटे व डाॅ. प्रकाश आमटे यांनीही आपल्या व्यवसायातून मोलाचा वेळ काढून बाबांना मदत केली.
बाबांच्या दोन्ही सुना डाॅ. मंदाकिनी आणि डाॅ. भारती देखील बाबांच्या कार्यात सहभागी आहेत. डाॅ. प्रकाश आमटे हे आपल्या पत्नी डाॅ. मंदाकिनी सोबत गडचिरोली येथील हेमलकसा गावात मदिया गोंड जमातीच्या लोकांसाठी एक शाळा व एक हाॅस्पीटल चालवतात.
डाॅ. मंदाकिनी यांनी सरकारी नोकरी सोडून डाॅ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर हेमलकसा येथे स्थायीक होऊन त्या गोरगरीबांची व जखमी जनावरांची सेवा करतात.
बाबांचे थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हाॅस्पीटलची जबाबदारी सांभाळतात.

वर्तमानात हेमलकसा येथे एक मोठी शाळा व हाॅस्पीटल आहे. तर आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी एक अनाथाश्रम आणि अंध व गोर गरीबांच्या मुलांसाठी शाळा आहे. आजही स्वसंचालीत आनंदवन आश्रमात जवळजवळ ५ हजार लोक राहतात.
महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जग भरात नावाजले जात आहे. आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते.

मिळालेले पुरस्कार असे :                                                                                                        ● पद्मश्री पुरस्कार : (१९७१)
● रमण मॅगसेसे पुरस्कार : (१९८५)
● पद्म विभूषण : (१९८६)
● मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार : (१९८८)
● गांधी शांती पुरस्कार : (१९९९)
● राष्ट्रीय भूषण : (१९७८)
● जमनालाल बजाज अवार्ड : (१९७९)
● एन.डी. दीवान अवाॅर्ड : (१९८०)
● रामशास्त्री अवार्ड : (१९९३) ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
● इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड : (१९८५)
● राजा राममोहन राॅय अवार्ड : (१९८६) दिल्ली सरकार
● फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड : (१९८७)
● जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड : (१९८७)
● आदिवासी सेवक अवार्ड : (१९९१) भारत सरकार
● मानव सेवा अवार्ड : (१९९७) यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
● सारथी अवाॅर्ड : (१९९७) नागपुर
● महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड : (१९९७) नागपुर
● कुमार गंधर्व पुरस्कार : (१९९८)
● सावित्रीबाई फुले अवाॅर्ड : (१९९८) भारत सरकार
● फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर ऑफ काॅमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिी अवार्ड : (१९८८)
● आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार : (१९९८)
● महाराष्ट्र भुषण अवार्ड : (२००४) महाराष्ट्र सरकार या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

सन्मानीत पदव्या :                                                                                                              ● डी.लिट : टाटा इंस्टीटयुट ऑफ सोशल सायन्स मुंबई , भारत १९८५
● डी.लिट : १९८० नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
● डी लिट : १९८५-८६ पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
● देसिकोत्तमा : १९८८ सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल, भारत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा