गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा कुस्तीपटू अंजली वल्लाकट्टी यांना सुवर्णपदक

कुस्तीपटू अंजली वल्लाकट्टी यांना सुवर्णपदक

अहमदनगर: नगरच्या अंजली वल्लाकट्टी यांनी दिल्लीच्या त्यागराज स्टेडीयम येथे झालेल्या कजाक कुराश नॅशनल चँपीयनशिप कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
चंडीगडच्या खेळाडू कुंकुमला केवळ ५० सेकंदात चीतपट करत अंजली यांनी अंतिम फेरीत बाजी मारली.
अंजली वल्लाकट्टी यांची आता कझाकिस्तान येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे.
अंजली यांच्याविषयी अंजली या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. दरम्यान, गेल्या १० ते १२ वर्षापासून त्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांपासून अलिप्त होत्या.
मात्र राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेऊन प्रदीर्घ काळानंतर त्यांनी यावर्षीच्या कजाक कुराश नॅशनल चँपीयनशिप कुस्ती स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान, यासाठी त्यांना क्रीडा प्रशिक्षक प्रा.संजय धोपावकर व अंकुश नागर यांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!
Exit mobile version