कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षाची मुलगी गंभीर जखमी

इंदापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा , ना नगरपालिकेला , ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे.

कालठण क्रमांक १ (ता. इंदापूर )येथे चार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. संध्या शाहू उमप (रा. आंतरवली ता. गेवराई जि. बीड) असे जोखमीचे नाव असून तिला उपचारार्थ ससून रुग्णालय पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ या ऊसतोडणी कामगारावर आली आहे.
संध्या हि आपल्या आई वडीलांसमवेत कालठण येथील शेतक-यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी गेली होती. आई वडील ऊस तोडणी करत असताना हि बालिका खेळत होती. या ठिकाणी चार मोकाट भटक्या कुत्र्यांनी तीच्यावर हल्ला केला. या कुत्र्यांनी तीच्या दोन्ही हाताला व डोक्याला चावा घेवून गंभीर जखमी केले आहे.दरम्यान सर्व ऊस तोडणी कामगारांनी आरडाओरडा केल्या नंतर कुत्र्यांनी पळ काढला. दरम्यान कुत्र्यांचा या हल्ल्यामुळे ऊस तोडणी कामगार व महीला मजूर व नागरिकांमध्येही भिती चे वातावरणात निर्माण झाले आहे.

भटक्या कुत्र्यांची समस्या इतकी गंभीर असूनही कायमस्वरुपी इलाज करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही शेतकरी व नागरिकांना रात्री शेतात दारी देण्यासाठी जीव मुठीत धरूनच जावे लागते. कारण कोपऱ्या-कोपºयावर विशेषतः या परिसरात ही कुत्री टोळीने असतात.
यापुर्वी हि या मोकाट कुत्र्यांनी जवळपास २५ ते ३० शेळ्या खाल्ल्या आहेत तर गाई म्हशी यांच्या वर हल्ला करुन जखमी केले ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
दरम्यान आता या मोकाट भटक्या कुत्र्यांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा