पुणे, दि. १ ऑगस्ट २०२०: पोस्टकार्ड भेजो आंदोलनची सुरुवात पुण्यातील एल.एल. बी च्या विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे एल.एल.बी.विद्यार्थ्याचे प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्र पूर्ण नाही झाले. जरी प्रथम वर्षी विद्यार्थ्यांना पास केले असले तरी ही ‘द्वितीय वर्षाच्या एकूण फी मध्ये ५० % सवलत देण्यात यावी’ अशी मागणी एल.एल. बी चा विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड भेजो आंदोलन मोहिम हाती घेतली आहे .
मा. राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी ,महाराष्ट्र राज्य, मा. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे , महाराष्ट्र राज्य, उदय सामंत , मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना या मोहिमेअंतर्गत विद्यार्थी पत्र पाठवत आहेत.
पत्रातील मजकूर खालील प्रमाणे आहे,
मी व इतर १२ महाविद्यालयातील सर्व प्रथम वर्षीय एल.एल.बी.विद्यार्थी (सा.फु.पु वि) आपल्याकडे मागणी करीत आहोत की आम्हाला द्वितीय वर्षाच्या एकूण फी मध्ये ५०% सवलत देण्यात यावी कारण आमचे महाविद्यालये द्वितीय सत्रात १० दिवस ही पुर्ण झाले नाही, म्हणजेच केवळ ८% ते ९% झालेले आहे.
आम्हाला द्वितीय वर्षाच्या एकूण फी मध्ये ५०% सवलत देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी आपल्याला कळकळीची विनंती.’
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.