वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या १५ एकर जागेवर श्रमदान

8

उस्मानाबाद, दि. ३० जून २०२० : कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या हितासाठी ठिकठिकाणी उपक्रम राबविले जात आहेत. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे आज दिनांक ३० जून रोजी वनविभागाच्या १५ एकर जागेवर श्रमदानाचा उपक्रम आयोजण्यात आला. याप्रसंगी, खासदार ओमराजे निंबाळकर प्रशासनाच्या वतीने या उपक्रमात सहभागी झाले, तेथे त्यांनी स्वतः देखील या उपक्रमात श्रमदान केले. श्रमदान केलेल्या या जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रूपाली डामे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, वनपरिवेक्षक अधिकारी पवार, तालुका कृषी अधिकारी गायकवाड , शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, तामलवाडी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर, अपुराज गवळी, पांडुरंग लोंढे, राजेंद्र सगर, रामा कदम, अमोल घोटकर, कृष्णा घोटकर, दत्तात्रय शिंदे तसेच वन विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा