लग्न करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींसाठी

आपल्या आयुष्यामध्ये काही सवयी अशा असतात की त्या सवयींचे परिणाम आपल्याला उशिरा समजतात किंवा त्या उशीरा समोर येतात. अशा चुकीच्या सवयींची मजा लगेच चाखता येते. परंतु त्या सवयींचे दुष्परिणाम मात्र आपल्याला काही कालावधीनंतर भोगावे लागतात. आपल्याला आता छोट्या वाटणाऱ्या परंतु आपल्या जीवनावर वाईट परिणाम करणाऱ्या सवयींचा परिचय करून घेणार आहोत. या सवयींचा त्याग केल्याने गृहस्थी जीवन सर्व अर्थांनी सुखी होईल. लग्न करू इच्छिणाऱ्या मुला मुलींनी पुढील सवयी सोडून द्याव्यात…

◆ नशा :
नशा मग ती कोणत्या प्रकारची का असेना, त्यामुळे गृहस्थी जीवनाचे नरक बनते.त्यामुळे आपले जीवनही उध्वस्त होऊ शकते.त्यामुळे शक्यतो नशा करणे टाळावे.

◆अहंकार:
माझेच खरे, असा हट्ट धरणे आणि जोडीदारानेही मी सांगेल तसेच वागले पाहिजे, असा आग्रह धरणे यामुळे जीवन दु:खमय बनून जाईल. स्वतः मधला मीपणा कमी केला की, जीवन सुखकर करण्यास मदत होईल. जगातला कोणीही मनुष्य १०० टक्के परिपूर्ण नसतो, याचा विसर पडू देवू नका.

◆ आळस :
नवरा आणि बायको या दोघांतील एक जरी आळसी आणि कामचुकार असेल तर घरात नरक येवू लागले म्हणून समजा. त्यामुळे आळशीपणाला वेळीच दूर केले तर जीवन सुखकर होण्यास मदत मिळते.

◆ लपवा छपवी :
कोणतीही गोष्ट आपल्या साथीदारापासून लपविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संसारात विष कालवण्या सारखे आहे.त्यामुळे लग्नाआधी किंवा लग्नानंतर आपल्या जोडीदारापासून कोणतीही गोष्ट लपवू नये.

◆अपेक्षा:
आपला जीवनसाथी आदर्श असला पाहिजे अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे सत्यापासून दूर जाणे होय. जीवनात कुणीही कधीही इतरांच्या अपेक्षेनुसार असेलच असे नाही.

◆ उधळपट्टी:
आपली वास्तविक क्षमता न पाहता अधिक सुविधांचा भोग करण्याची इच्छा बाळगणे आणि आपल्या शक्तीपेक्षा अधिक खर्च करणे म्हणजे संसारात विस्तव आणणे होय.

◆आर्थिक दुर्बलता:
पैशाच्या कमतरतेमुळेही आपल्या गृहस्थी जीवनात समस्या निर्माण होतात. त्यामुळे गृहस्थी जीवनात प्रवेश करण्यापूर्वी आपण आत्मनिर्भर असले पाहिजे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा