टेक्सास अमेरिकच्या: शुक्रवारी ह्युस्टनपासून सुमारे १२० किमी अंतरावर असलेल्या ग्रोव्हटन येथे, ३६ वर्षीय हेथ बूमपसने आपल्या लग्नाच्या मोबदल्यासाठी बँक दरोडा टाकला. लग्नाची अंगठी, रिस्पेशन आणि इतर खर्चासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र नंतर त्याने आपल्या बायको च्या सांगण्यावरून शरणागती पत्करली.
वास्तविक, पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर पोस्ट केले होते. जेणेकरुन लोकांना आरोपीची ओळख पटेल आणि शक्य होईल तितक्या लवकर माहिती देण्यात येईल. शुक्रवारी सकाळी आरोपी हे ग्रोव्हटनजवळील सिटीझन स्टेट बँकेत गेला आणि त्यांनी कर्मचार्यांकडून पैशाची मागणी केली. त्याने येथून पैसे घेऊन जंगलात धाव घेतला. शनिवारी बम्पसचे लग्न होणार होते.