लग्नासाठी नाव नोंदवताय….. सावधान!

विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण. त्यामुळे या पवित्र सोहळ्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्यांचे भिंग लवकर फुटवे. लवकरात लवकर त्यांचा पर्दाफाश व्हायला हवा, दरम्यान तुम्ही येत्या काळात लग्नाच्या विचारात असाल आणि लग्न लावून देणाऱ्या संस्थांमध्ये नोंदणी करायचा प्लान करत असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा. नाहीतर तुम्ही देखील अशा हनी ट्रॅपमध्ये रोवले जाल.

लग्न जुळवण्यासाठी गेल्या काही वर्षांत मॅट्रिमोनियल साईट्स किंवा मॅट्रिमोनियल संस्थांनी मार्केटमध्ये आपले पाय चांगलेच रोवले आहेत. यातून मात्र एक निदर्शनास आले आहे की, अनेक बोगस मॅट्रिमोनियल संस्था उभारल्या जात आहेत. तिथं चक्क हनी ट्रॅप लावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
यात पुरुषांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. यातून नागपूर सह अन्य शहरांमध्ये आणि आणखी काही राज्यांमध्येही असे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत.शिवाय या संस्थांची काम करण्याची पद्धतही अत्यंत वेगळी असल्याचे पहायला मिळाले आहे.

एखादी खोली भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी दोन संगणक, दोन मुलींना बसवून वधू-वरांची नोंदणी केली जाते.
तिथे येणाऱ्या इच्छुक पुरुषाचं उत्पन्न पाहून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची योजना आखली जाते.
त्यानंतर त्या व्यक्तीला भेटण्यासाठी दोन-तीन मुली पाठवल्या जातात. त्यातील एखादी मुलगी आवडली की तिच्यासोबत त्यांच्या भेटी घडवून आणल्या जातात. त्यानंतर ही तरुणी फोटो काढून पुढे त्या पुरुषाला ब्लॅकमेल करते.

नोंदणीसाठी घेतले जाणारे ४ ते १० हजार रुपये शुल्क स्वरूपात घेतले जातात. ते वेगळे. उपराजधानी नागपूरमध्ये त्याच सोबत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये अनेक संस्था आहेत. त्याशिवाय मध्य प्रदेश, जबलपूरमधल्या संस्थांची अनेक कार्यालय राज्यात सुरु आहेत. अशा संस्थांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारींचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा संस्थांकडे विवाह नोंदणी करणे टाळणे गरजेचे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा