गोल पोस्ट महाराष्ट्र लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार आचरणात आणावेत: दादासाहेब सोनवणे

लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार आचरणात आणावेत: दादासाहेब सोनवणे

इंदापूर, १७ फेब्रुवरी २०२१: इंदापूर येथील साठे नगर येथे आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची १४० वी पुण्यतिथि  अण्णा भाऊ साठेनगर ग्रंथालय या ठिकाणी करण्यात आली.

यावेळी साठे नगर येथील सार्वजनिक वाचनालयात आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत.तसेच समाजाला योग्य दिशेला नेले पाहिजे असे प्रतिादन माजी नगसेवक दादासाहेब सोनवणे यांनी यावेळी केले.

या प्रसंगी मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल ढावरे, ललेंद्र शिंदे, बाळासाहेब आडसुळ, ऊमेश ढावरे, नंदकुमार खंडाळे, अमित ढावरे, बापू मखरे, रणजित ढावरे,मोहन शिंदे, सतिश सोनवणे, संतोष शिंदे, संजय खंडाळे आणि नागरिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version