लाल परीचे होणार खाजगीकरण ..?

मुंबई, दि. ९ जुलै २०२० : भारताच्या रेल्वे खासगीकरणानंतर आता सर्वसामान्यांची आवडती आणि शहरा पासून ग्रामीण भागाचा निसर्गरम्य वातावरणाचा प्रवास करवणारी “लाल परी” देखील आता खासगीकरण प्रक्रीयेत जाणार आहे.

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर एसटीचा प्रवसात मोठ्या प्रमाणात घट झाली असून सरकारच्या तिजोरीत देखील खडखडाट पहायला मिळतोय. त्यामधे ही राज्य कर्मचारांच्या पगारी द्यायला ही सरकारकडे पैसे नाहीत आणि अशात याचा फायदा घेत राज्यातील खासगी बस वाहतूकदारांनी एसटीचे उत्पन्न आणि प्रवासी नसलेल्या मार्गांवर खासगी बस वाहतूकदारांना संधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

कोरोना लाॅकडाऊन काळात सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. महामंडळाचे उत्पन्न आणि प्रवासी मिळत नसलेल्या मार्गांवर खासगी बस वाहतूकदारांना दिल्यामुळे अर्थिक मिळकत प्राप्त होईल. राज्यातील खासगी वाहतूकीला राज्य शासनाकडे एसटीच्या मार्गांवर खासगी बस चालवण्याची मागणी केली आहे. आणि याचा फायदा एसटी महामंडळाला सुद्धा कसा करून देता येईल याविषयीचे उपाय खासगी बस वाहतूकदारांनी राज्य शासनाला निवेदनातून दिले आहे.

राज्य परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी राज्य परिवहन विभागाची टास्क फोर्स समितीला त्यांची उपसमिती खासगी बस वाहतूकदारांच्या एकूण समस्या आणि त्यांच्या मागण्याचा अहवाल सादर करतील मग हा अहवाल राज्य शासनाकडे जाईल आणि त्यानंतर या सर्व मागण्या आणि समस्यांवर विचार केला जाणार असल्याचे व सध्या एसटीचे मार्ग खासगी बस वाहतूकदारांना देण्याचा कोणताही निर्णय नाही असे तेे म्हणाले. तर “पुढे सरकारी एसटी हे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार तसेच सुखकर पध्दतीने प्रवास घडवून आणते तसे खासगी वाहतूकदार करत नाहीत”असे मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) यांनी सांगितले तर खाजगीकरण्याच्या या प्रस्तवाचा त्यांनी निषेध देेखील व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे भारताची अर्थिक परिस्थिती हि डगमगली आहे. तर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केल्यानंतर भारतातील ६ विमानतळ हि विक्री करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चेला उधाण आले होते आता त्यात राज्याची आणि सर्वसामान्यांची लाडकी “लाल परी” अर्थात एसटी मंहाडळाच्या या प्रस्तावामुळे पुन्हा एकदा सर्वसामन्यांच्या संतापाला आणि चर्चेला उधाण आले आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा