लालू यादव यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणलं जाणार, पीएम मोदींची तेजस्वीशी चर्चा

नवी दिल्ली , 6 जुलै 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी तेजस्वी यादव यांना फोन करून राजद प्रमुख लालू प्रसाद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधानांनी लालू प्रसाद यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लालू यादव दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. दुसरीकडं, लालू यादव यांना चांगल्या उपचारासाठी बुधवारी म्हणजेच 6 जुलै रोजी पाटण्याहून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला आणलं जाण्याची शक्यता आहे.

3 जुलै रोजी संध्याकाळी लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरून पडल्याची बातमी आली होती. त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घाईघाईत लालू यादव यांचा आज एका खासगी रुग्णालयात एमआरआय करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खांद्याच्या हाडात हेअरलाइन फ्रॅक्चर झालं असून त्यांना दोन महिने बेड रेस्ट करण्यास सांगितलं आहे.

तेजस्वी यांचं आवाहन – रुग्णालयात येऊ नका, घरातूनच प्रार्थना करा

तेजस्वीने संध्याकाळी उशिरा एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितलं की आम्ही रुग्णालयात आहोत. जिथे गरिबांचे मसिहा, लालूप्रसाद यादवजींवर उपचार केले जात आहेत. मला तुम्हाला विनंती आणि आवाहन करायचे आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊ नका. रुग्णांचे हाल होत आहेत. संसर्ग होण्याची भीतीही असते. अशा परिस्थितीत, घरीच रहा आणि बरे होण्यासाठी प्रार्थना करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा