लांडे खून प्रकरणात संदीप कोतकरला जामीन

अहमदनगर : शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदिप कोतकर आणि त्यांचे बंधू सचिन कोतकर या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज जामीन मंजूर केला.
न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यांनी हा जामीन काही अटी शर्तींवर मंजूर केला असल्याची माहिती वकील महेश तवले यांनी दिली.
संदीप आणि सचिन कोतकर यांना जामीन मंजूर करताना जिल्हाबंदी, साक्षीदारांच्या गाठीभेटी न घेण्याबरोबरच धमकावणे आदीपासून दूर राहण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. अशोक लांडे खून प्रकरणात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्यासह त्यांचे पुत्र माजी महापौर संदीप, सचिन आणि अमोल यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या शिक्षेविरुद्ध कोतकर परिवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते. या अपील सुनावणीत त्यांनी जामीन अर्ज ठेवला होता. त्यावर सुनावणी होऊन माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांचे बंधू सचिन कोतकर यांना जामीन मंजूर झाला. या गुन्ह्यात पूर्वी अमोल कोतकर व भानुदास कोतकर यांना जामीन मिळाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा