बारामती, दि. १४ जुलै २०२०: बारामती शहरात नगरपालिका हद्दीत बुधवार दि. १५ मध्यरात्री १२ वाजल्यापासून कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहर लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊनचा कालावधी हा अनिश्चित काळासाठी असणार असल्याचे कांबळे यांनी जाहीर केल्यावर आज सकाळ पासून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
बारामती शहरात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचे अनेक रुग्ण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आढळल्याने शासनाने पाहणी केली असता बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांमुळे स्थानिकांना कोरोना संसर्गाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी बुधवार दि १५ च्या मध्यरात्री पासून लॉकडाऊन घोषित केल्यावर आज सकाळ पासून लगीन सराईच्या खरेदीसाठी, सराफ दुकान, भाजी मंडई, किराणा भुसार मालाचे व्यापारी, दारूची दुकाने, कापड दुकान अनिश्चित काळासाठी बंद असल्याने नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत कोरोना संसर्गाच्या सर्व नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र आज सर्रास पहावयास मिळत आहे.
शहरातील सर्व रस्त्यावर गर्दी असल्याने शासनाने नागरिकांना रिक्षाने पुकारून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करावे लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव