लासुर्णेत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात स्री जन्माचे स्वागत

लासुर्णे : लासुर्णे(ता.इंदापूर)येथील जि.प.शाळा शाळेत महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत केला होता यामध्ये स्री जन्माचे स्वागत,डेंग्यु आजाराबाबत महिलांना सखोल मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लासुर्णे येथे शैक्षणिक वर्षे १९/२० मध्ये पालखी, परिसर भेट, वृक्षारोपन, रक्षाबंधन, गोपाळकाला इ.उपक्रम राबविले. हळदी कुंकू या कार्यक्रमात शाळेतील मुलींनी राजमाता जिजाबाई ,सा.फुले , अहिल्या होळकर, मदर तेरेसा,इंदिरा गांधी या कर्तुत्ववान महिलांची वेशभुषा करुन त्यांच्या कार्याची माहिती महिलांना देऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले .

राजाराम शिंदे व संदिप एकतपुरे आरोग्य सेवक लासुर्णे यांनी डेंगू या आजाराबाबत महिलांना सखोल मार्गदर्शन केले. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास परिसरातील १२५ महिलांची उपस्थिती होती महिलांना तिळगूळ देऊन वही पेन, पाण्याच्या बॉटल या शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाण दिले . यावेळी ओटीभरण,स्री जन्माचे स्वागत, बेटी बचाव बेटी पढाव ही सामुदायिक प्रतिज्ञा महिलांना दिली नंतर महिलांसाठी उखाणे, चेंडू गोळा करणे, फुगे फुगवणे,अडथळा शर्यत, संगीत खुर्ची इत्यादी खेळ घेऊन विजेत्यांना बक्षिसे दिली कार्यक्रमाचे आयोजन श्वेता धायगुडे, निलावती भोसले, उषा धापटे अंगणवाडी मदतनीस मंगल मुळीक, लता जगताप, शोभा लोंढे यांनी केले. मुख्याध्यापक गणेश धायगुडे राजाराम शिंदे, तानाजी पोतकुले, संजय धापटे, गणेश शिंदे यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा