गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे लता मंगेशकर यांच्या नावाने पुण्यात आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार

लता मंगेशकर यांच्या नावाने पुण्यात आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ पुण्यात आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार आहे. हे भव्य रुग्णालय नंदोशी, सिंहगड रोड परिसरात सुमारे ४० एकर जागेवर उभारले जाणार आहे.

रुग्णालयाचे नाव ‘लता मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्दीष्ट फक्त अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणेच नाही, तर आरोग्य सेवेत संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षणास मोठा प्लॅटफॉर्म तयार करणे आहे.

प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले की, या रुग्णालयात अत्याधुनिक ICU, ओपरेशन थिएटर, संशोधन लॅब, आपत्कालीन विभाग, मुलांवरील विशेष उपचार केंद्र आणि प्रशिक्षण संस्था असे सर्व आधुनिक सुविधा असतील.

काम लवकरच सुरू होईल, आणि याची २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. या रुग्णालयाच्या सुरू होण्याने पुणे व आसपासच्या भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील, तसेच रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

स्मरणार्थ हे रुग्णालय लता मंगेशकर यांच्या जीवनातील योगदान आणि संगीत क्षेत्रातील अमूल्य कार्याला सन्मान देण्यासाठी स्थापन केले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version