आष्टी शहरात माजी सैनिकाकडून पोलिसांवर लाठीचार्ज

बीड, दि.११ मे २०२० : आष्टी शहराच्या लॉकडाऊनच्या विषम तारखेच्या दिवशी संचारबंदीच्या शिथिलतेच्या काळात आष्टी शहरात मोटर सायकल का अडवली ? याचा राग येऊन एका माजी सैनिकांने आणि त्याच्या भावाने होमगार्डच्या हातातील काठी हिसकावून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाठी हल्ला केला. त्यामध्ये दोन्ही कर्मचारी जखमी झाले असून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

शनिवार (दि.९) रोजी सकाळी ९च्या सुमारास शनिचौक येथे ते कमानवेस या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रहदारीचे नियम करण्यासाठी पो.कॉ.रियाज पठाण आणि शैलेश वांढरे हे रस्त्यावर उभे होते. याकाळात मोटरसायकली चौकामध्ये उभ्या करून दुकानाकडे पायी चालत जावे म्हणजे गर्दी होत नाही. या नियमानुसार मोटार सायकलवर थेट दुकानासमोर आलेल्या शांतिनाथ फुंदे व त्याचा भाऊ शरद फुंदे यांनी वाहन इथे उभे करू नका. बाजूला लावा असे म्हणताच या दोघांनी पोलीस होमगार्ड यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

त्यानंतर गस्तीवरील फौजदार अमित करपे ,सहाय्यक फौजदार अरुण कांबळे, पोलीस कर्मचारी अजित शिकेतोड, सचिन कोळेकर यांनी फुंदे बंधू यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना शरद शिंदे यांनी शैलेश वांढरे यांच्या हातातील काठी हिसकावली आणि पोलिसांना मारण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सचिन कोळेकर यांच्या डोक्यात मार बसला तर रियाज पठाण यांचे पायावर जखम झाली आहे.

अखेर पोलिसांनी या दोघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित करपे पुढील तपास करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा