लातूर मतदारसंघातील कॉंग्रेसच्या नवनियुक्त सरपंच, सदस्यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

लातूर, २५ डिसेंबर २०२२ : लातूर ग्रामीण व शहर मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांकडून करण्यात आलेले दावे कितपत सत्य होते, याचा आज प्रत्यय आला. निमित्त होते शनिवारी (ता. २४) जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर ग्रामीण व शहर मतदारसंघातील काँग्रेसचे नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते, तसेच आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेला सत्कार सोहळा.

शनिवारी (ता. २४) जिल्हा काँग्रेसतर्फे लातूर ग्रामीण व शहर मतदारसंघातील काँग्रेसच्या नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभास तब्बल ८१ सरपंच व ५६१ सदस्य उपस्थित होते. यावरून विरोधी पक्षाकडून केलेले दावे आजच्या सत्काराने फोल ठरले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जे सत्य आहे ते सत्यच असते, याचा प्रत्यय आजच्या सत्कार सोहळ्यात दिसून आला.

एकंदरीत हा विजय काँग्रेसचे लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कार्याचा, विचारांचा असून, या सत्कार सोहळ्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा