माढा, ९ ऑक्टोबर २०२०: माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगरचा सिझन २०२०-२१ गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते मोळी पूजनाने संपन्न झाला.
यावेळी बोलताना प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की चालू वर्षी ६.५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्तमरित्या पार पडेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. प्रारंभी तानाजी कदम व सौ. प्राजक्ता कदम यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, कार्यकारी संचालक किरण सावंत, केशव सावंत, पृथ्वीराज सावंत, कृष्णात बोबडे, संजय कोकाटे, सूर्यकांत शेंडगे, शिवाजी कांबळे, अतुल खुपसे, एक्झिक्युटिव डायरेक्टर अविनाश वाडेकर, जनरल मॅनेजर सुरेश पाटील, प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट क्षिरसागर, बाळासाहेब गाडे, विकास गाडे, मधुकर देशमुख,विनोद पाटील, वेणेगावच्या उपसरपंच सौ.स्वाती कदम, तानाजी गाडे, पंढरीनाथ चंदनकर, रामचंद्र टाकले, भारत माने, भजनदास खटके ,सोमनाथ कदम, गणेश गोडसे, अण्णासाहेब माने, तानाजी सलगर, भाऊ काळे, शंकर सुरवसे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी वाहतूकदार व कारखान्यातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खटके यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील