इंदापूर, दि. १९ ऑगस्ट २०२०: सध्या इंदापूर शहरासह तालुक्यात कोरोना थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विरूद्धच्या लढाईत येथील युवा क्रांती प्रतिष्ठान यांनी रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मोफत आयुर्वेदिक काढा वाटण्याचा शुभारंभ केला आहे.
इंदापूरकरांसाठी दररोज संध्याकाळी ५.०० ते ६.०० च्या दरम्यान इंदापूर येथे विवीध ठिकाणी सर्व नागरीकांसाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवीणारा मालेगाव पॅटर्न काढा मोफत वितरण केला जातो. शहरातील विविध ठिकाणी चौकात हा रोग प्रतिकार शक्ती वाढविणारा काढा नागरिकांना मोफत वाटण्यात येत आहे. आज पर्यंत तब्बल ५०१० कप काढा इंदापूर शहरासह परिसरात वाटण्यात आला असल्याची माहिती युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शिताप आणि धर्मचंद लोढा यांनी दिली.
या सामाजिक कार्यात जय हिंद व त्रीदल माजी सैनिक संघटना, जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग कॉलेज, रचना परिवार, प्रहार दिव्यांग संघटना आणि इंदापूर सायकल क्लब आदी संघटनांनी सहभाग घेतला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे