पुणे , दि. १६ सप्टेंबर :महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या व पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाचा प्रारंभ विश्रामबाग वाडा विभागातील प्रभाग क्र. ३० मध्ये करण्यात आला.
यावेळी घरोघर जाऊन तपासणी करण्यात आली.घरोघरी स्क्रीनिंग करण्याचे काम पुणे महानगरपालिकेच्या विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ उपमहापौर माननीय सरस्वती शेंडगे यांच्या कार्यालयापासून करण्यात आला याप्रसंगी सभागृह नेते धीरज घाटे ,कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा स्मिताताई वस्ते, नगरसेवक मा.रघुनाथ गौडा, पुणे महापालिकेचे उपायुक्त सपकाळ साहेब, क्षेत्रीय आधिकारी आशिष महाडदळकर,वैद्यकीय आधिकारी डॉ.उजवनकर, डी.एस.आय बंडगर तसेच भारतीय जनता पार्टीचे सुनील खंडागळे, विजय गायकवाड, निलेश वैराट, अर्जुन
खानापुरे,आप्पा खंडाळे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.