5000mAh बॅटरी सह Oppo A57 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

पुणे, 14 एप्रिल 2022: Oppo ने आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन Oppo A57 5G लॉन्च केला आहे, जो A-सिरीजचा भाग आहे. हा फोन Oppo A56 5G चा अपग्रेड व्हर्जन आहे, जो गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाला होता. हँडसेट 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, Octacore MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 8GB रॅम आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि इतर खास फीचर्स.

Oppo A57 5G ची किंमत

कंपनीने हा फोन आपल्या देशांतर्गत बाजारात म्हणजेच चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 1499 युआन (अंदाजे रुपये 17,900) आहे. ब्रँडने फोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट देखील लॉन्च केला आहे, परंतु सध्या त्याची किंमत उघड केलेली नाही.

हा फोन ब्लू, ब्लॅक आणि Lilac या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. कंपनी हा फोन चीन व्यतिरिक्त इतर बाजारात लॉन्च करेल की नाही हे सध्या माहित नाही. चीनमध्येही त्याची विक्री १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

डिटेल्स

Oppo A57 5G ड्युअल सिम सपोर्टसह येतो. हँडसेट Android 12 आधारित कलर OS 12.1 वर काम करतो. यात 6.65-इंचाची HD+ स्क्रीन आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटसह येते. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरवर काम करतो, जो Mali G57 MC2 GPU सह येतो. यामध्ये 8GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे.

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची प्रायमरी लेन्स 13MP आहे. स्मार्टफोनमधील सेकंडरी लेन्स 2MP आहे, जी एक पोर्ट्रेट सेन्सर आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे.

मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm जॅक आहे. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा