ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी विशेष लोकल चालू करा – मनसे आमदार राजू पाटील

डोंबिवली , १० ऑगस्ट २०२० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून केद्र सरकारने मार्च महिन्यापासूनच देशभरात लॉकडाऊन हा जाहिर केला होता . त्यामुळे कंपन्या, शाळा महाविद्यालये, वाहतूक सेवा आणि इतर सर्व गोष्टी या टाळेबंद करण्यात आल्या . मात्र आता जवळपास चार महिने होत आले तरी सुद्धा हा लॉकडाउन अद्याप हटविण्यात आला नाही मात्र काही प्रमाणात खाजगी कंपन्या या सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी विशेष लोकल चालू करण्याची मागणी केली आहे .

खाजगी तसेच सरकारी कार्यालये ही काही प्रमाणात सूरू झाल्या आहेत. मात्र कंपन्या सूरू झाल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या खाजगी वाहनांने प्रवास करावा लागत आहे. मात्र नवी मुंबई किंवा मुंबईकडे जाण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील प्रवाशांना कल्याण-शीळ रस्त्यावरची वाहतूक कोंडीमूळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा येथील प्रवाशांची लोकल बंद असल्यामुळे प्रचंड हाल होताना दिसत आहे.

त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन या शहरांसाठी लोकल सेवा चालू केल्यास दिलासा मिळेल. त्यामुळे विशेष लोकल चालू करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यावर काय पाऊल घेणार हे पाहणं महत्वाचे ठरेल .

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा