समान नागरी कायद्यासंदर्भात ५० लाखांहून अधिक सूचना विधी आयोगाला प्राप्त

12

नवी दिल्ली, १४ जुलै २०२३: विधी आयोगाला UCC म्हणजेच समान नागरी संहितावर, गुरुवारपर्यंत ५० लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. हा आकडा ऑनलाइन सूचनेचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन सल्ल्याशिवाय आयोगाला ऑफलाइनही सूचना मिळाल्या आहेत. सूचना पाठवण्याची मुदत आज संपत आहे.

काही संस्थांनी आयोगाकडे UCC वर वैयक्तिक सुनावणीची मागणी केली आहे. माहितीनुसार, प्रतिसाद तपासल्यानंतर आयोग वैयक्तिक सुनावणीसाठी संघटनांना आमंतत्रित करण्याबाबत निर्णय घेईल. १४ जून रोजी विधी आयोगाने समान नागरी संहितेवर या विषयावर सार्वजनिक आणि मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांसह भागधारकांकडून विचार मागवून सल्लामसलत प्रक्रिया सुरू केली होती. समान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व नागरिकांसाठी समान कायदा. येत्या काही दिवसांत उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू होणार आहे.

यासंदर्भात एआयएलयू सरचिटणीस पीव्ही सुरेंद्रनाथ म्हणाले की, विविध सांस्कृतिक पद्धतींचे एकरूप होणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही. हे धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्राच्या एकतेच्या विरोधात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड