मुसेवाला हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा, लॉरेन्स बिश्नोईच मास्टरमाईंड

नवी दिल्ली, 9 जून 2022: गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. या प्रकरणाचा सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई याची प्रदीर्घ काळ चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या खून प्रकरणातील आतापर्यंत पाच आरोपींची ओळख पटली असून पुढील तपास सुरू असल्याची माहितीही देण्यात आलीय.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही मुसेवालाच्या हत्येची तयारी फार पूर्वीपासूनच करण्यात आली होती आणि रणनीतीनुसार ही घटना घडवून आणली होती, यावर भर दिला. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई हा मुख्य आरोपी म्हणून समोर आला आहे, तर दुसरीकडं सिद्धेश हिरामलची या प्रकरणात सक्रिय भूमिकाही समोर आलीय.

पत्रकार परिषदेत दिल्ली पोलिसांच्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली. या घटनेची उकल करण्यात दिल्ली पोलिसांनी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे. त्यांनी मिठू खेडा येथील दोन शूटर्सनाही पकडं होतं. तपासादरम्यान विकास महालेचे नाव पुढे येताच दिल्ली पोलिसांनी त्यालाही अटक केली.

त्याचबरोबर मूसवाला हत्याकांडात ज्या आरोपींची नावे समोर आली आहेत, त्यापैकी एक सिंगरच्या अगदी जवळचा असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते आधी एकत्र शूट करायचे. अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते. महाकाल उर्फ ​​सिद्धेश हिरामल याच्या अटकेमुळं या प्रकरणातील अनेक दुवे स्पष्ट होऊ शकतील, असं सध्या दिल्ली पोलीस गृहीत धरत आहे. या प्रकरणाचा तपास लॉरेन्स बिश्नोई चौकशीदरम्यान करत असलेल्या खुलाशांच्या आधारे पुढं जात आहे.

महाकालबाबतही ही माहिती समोर येत आहे की तो मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या मारेकऱ्याच्या अगदी जवळचा आहे. यावेळी महाकालला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केल्यामुळं त्याच्या चौकशीदरम्यान दोन राज्यांचे पोलीस एकत्र काम करणार आहेत. दिल्ली पोलीसही त्यांची चौकशी करणार असून मुंबई पोलीसही त्यांच्या पुराव्यांच्या आधारे प्रश्नोत्तरे करणार आहेत.

पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्राचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी स्पष्ट काहीही सांगण्यास नकार दिला, मात्र मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा