उत्तरप्रदेश, ३० ऑगस्ट २०२३ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील तहसील परिसरात, वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये आज दुपारी वकिल मनोज चौधरी आपल्या चेंबरमध्ये जेवण करत होते. यावेळी दोन अज्ञात हल्लेखोर तेथे आले. त्यांनी मनोज यांच्यावर गोळीबार केला. चेंबरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाली आहे.
या घटनेबद्दल माहिती देताना गाझियाबाद शहराचे पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल म्हणाले, आज दुपारी वकिल मनोज चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी फुटेज तपासत आहेत. फाॅरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर