आता वकिलांना काळा कोट घालणे बंधनकारक नाही: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, दि.१४ मे २०२०: सध्या भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या आजारामुळे लोकांची जगण्याची पद्धतच बदलल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टने देखील वकिलांना अंगात काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात वकिलांना कोट घालणे बंधनकारक नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करणारे वकीलच केवळ पांढरा शर्ट आणि नेक टाय वापरु शकतील. असा तात्पुरत्या स्वरूपाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटलं की, ‘व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान, वकील मंडळी प्लेन पांढरा शर्ट, पांढरी सलवार-कमीज, पांढरी साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरु शकतात.तसेच वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे.’ असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा