‘एलसीएच’ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर २०२२ : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सोमवारी स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) दाखल होईल. त्यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. हे बहुउपयोगी हेलिकॉप्टर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यास आणि इतर शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.

हे सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) एलसीएच विकसित केले आहे. हे प्रामुख्याने उंच भागात तैनात करण्याच्या दृष्टीने हे हेलिकॉप्टर डिझाइन केले असून पहिल्या टप्प्यात १० हेलिकॉप्टर जोधपूर येथे भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आले. यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ‘प्रचंड’मधून जोधपूर एअरबेसवर उड्डाण केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या उपस्थितीत जोधपूरच्या हवाई दलाच्या स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात एलसीएचचा समावेश केला जाईल. ते म्हणाले की ५.८ टन वजनाच्या आणि दोन इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरची अनेक शस्त्रे वापरण्यासाठी यापूर्वीच चाचणी घेण्यात आली आहे.

कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथसिंह म्हणाले की, एलसीएचसाठी (LCH) नवरात्रीपेक्षा चांगला वेळ आणि राजस्थानच्या मातीपेक्षा चांगली जागा असू शकत नाही. वीरांच्या भूमीपासून नवरात्रीतच एलसीएचला सुरूवात झाली, एलसीएचच्या समावेशामुळे हवाई दलाची ताकद वाढेल. सर्व शक्तीचे मोठे सूचक एलसीएच असणार आहे. देशाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा हा अभिमान असणार आहे. एलसीएच बाबतचा विजय रथ तयार आहे. एलसीएच ने सर्व आव्हाने पेलली आहेत. शत्रूंना सहज टाळता येते.

१९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान, लष्कराला उच्च उंचीवर हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरची तीव्र कमतरता होती. त्या काळात अशी हेलिकॉप्टर असती तर पर्वतांच्या माथ्यावर बसलेले पाकिस्तानी लष्कराचे बंकर लष्कराला उडवता आले असते. हे अंतर भरून काढण्यासाठी तज्ञांनी पुढाकार घेतला आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कॅम्पसमध्ये त्याचे उत्पादन करण्याचे आव्हान स्वीकारले. लष्कर आणि हवाई दलाच्या आवश्यकतेनुसार डिझाइन तयार करण्यात आले आणि या प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा