इंदापूर, २५ डिसेंबर २०२०: राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नृसिंह मंदिराला काल (दि.२४) सायंकाळी भेट देऊन श्री लक्ष्मी-नृसिंहाची पुजा करून दर्शन घेतले.
यावेळी मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने सत्कार केला. तसेच श्री लक्ष्मी नृसिह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त अभय वांकर यांनी सत्कार केला.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मंदिर परिसरात चालू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर दशरथ राऊत यांनी प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना चहा दिला. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूरचे शहराध्यक्ष शकील सय्यद आदीसह इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रिमंडळातील वादावादी ही जनहितासाठी का स्व:हितासाठी ?- देवेंद्र फडणवीस
बिल्डरांचा प्रीमियम कमी करण्यासंदर्भात काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी वादावादी झाली ती जनहितासाठी होती की स्वहिता होती, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. यासंदर्भातही अनेक चर्चा समोर येत आहेत. आमची मागणी आहे की याचा फायदा ग्राहकांना झाला पाहिजे. मात्र जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायदा करायला हे सरकार निघाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली. विजेची भरमसाठ बिले कमी करत नाहीत मात्र दारुचे परवाने फी सरकार कमी करत आहे हे आश्चर्यकारक असल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे