अमरावती, ९ सप्टेंबर २०२३ : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत होत्या, त्यांना आता दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विरोध पक्ष नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावरील दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध असलेल्या एफआयआर रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकार सत्तेच्या भरोशावर खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करत आहे. सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. आमची सत्ता आली की या मध्ये जो जो दोषी असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करु आणि सत्यता बाहेर आणू असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत होत्या मात्र त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विरोध पक्ष नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप त्यांच्यांवर झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावरील दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध असलेल्या एफआयआर रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. सरकार सत्तेच्या भरोशावर खऱ्याचे खोट आणि खोट्याच खरे करत आहे. सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. आमची सत्ता आल्यावर नव्याने रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करू आणि यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
काय होते आरोप?
रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात, तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे