जाणून घ्या थोडे कोरोना लसी बाबत…..

नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ तारखेला देशातील अहमदाबाद, हैद्राबाद आणि पुण्याचे दौरे केले. ज्यामधे त्यांनी कोरोना लसीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सखोल चर्चा केल्याचं समजत आहे. तर दौऱ्यावर मोदीं सोबत मोठे नेते नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिल्यानंतर सिरमचे आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन एक सकारात्मक आणि मोठी घोषणा केली आहे. लवकरच भारतात लसीचं वितरण केलं जाईल आणि त्यासाठी ते येत्या दोन आठवड्यात सिरम इन्स्टिट्यूट भारत सरकार कडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करेल असे ते म्हणाले. तसेच कोरोना वरील लस आणि लसीकरण बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर सखोल चर्चा झाल्याचे ही सांगितले. सर्वात अगोदर भारतात कोव्हॅक्सीन चे वितरण होणार आसून याच्या किमती बाबत पंतप्रधान मोदींसोबत काही चर्चा न झाल्याचे ही म्हटले. तर जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध होणार आसून कोरोनाच्या तिसर्या टप्प्यातील चाचणी कडे आमचं सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पुनावाला यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कुठे होणार लसींचा साठा?

सध्या कोरोना लसीची अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आसून आता त्या कुठे साठवल्या जातील याची तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ८ मुख्य शहरांमध्ये त्याचा साठा ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्ह्यांसाठी वाॅकींग कुलर व वाॅकींग फ्रिजर देण्याचा निर्णय घेतला आहे. लस प्राप्त झाल्यावर या ठिकाणी त्याचा साठा होऊन वितरण करण्यात येईल असे पुण्याचे सार्वजनिक आरोग्य सहसंचालक दिलीप पाटील यांनी दिली. तर नाशिक, अकोला, नागपूर, औरंगाबाद, लातूर, पुणे, ठाणे व मुंबई चा या मधे समावेश आहे.

लसीच्या साईड इफेक्ट बद्दल सावध रहा….

एकीकडे कोरोना लसीचे काम काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. तर अनेक संशोधक कोरोनावर लस शोधत आहेत. आनेक कोरोना लसीचे ट्रायलचे परिणाम सकारात्मक आले असले तरी त्यातील साईड इफेक्ट बाबत तज्ञांनी सावधगिरी बाळगायला सांगितली आहे. कुठल्याही लसीचा दुष्परिणाम थोड्या प्रमाणात का होईना होतात. ज्यामुळे भिती देखील वाटते. पण, मोठ्या प्रमाणावर होणार्या साईड इफेक्ट च्या लसीला परवानगी देण्यात येणार नसल्यचेही तज्ञांनी म्हटलं आहे. कुठल्याही आजारावर लस निघण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जातो. मात्र सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा मार्ग थोडा सोपा केला आहे. तर कोरोना लस तयार करण्यासाठी रेग्युलर होणार्या रूटीन लसीच्या कार्यप्रणालीमध्ये कपात करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा