बॉलिवूडची संधी सोडून, सैन्यदलात जाण्याचा घेतला निर्णय ; लेफ्टनंट गरिमा यादव

हरियाणा, २३, जून २०२० : हरियाणाची मुलगी दिसायला अत्यंत सुंदर म्हणून सहजच सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला…आणि ती विजयी झाली…मग पुढच्या…अजून पुढच्या सौंदर्य स्पर्धेत ती भाग घेत गेली अन् प्रत्येक स्पर्धेत विजयी होत गेली. आता तिला इटलीला आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला जायची संधी मिळाली होती जय्यत तयारी सुरू होती….

अन्……नेमकी त्याच दरम्यान तीची सीडीएस परीक्षा होती (CDS- कंबाइन्ड डिफेन्स सर्विसेस) पहिल्याच प्रयत्नात गरिमा ही परीक्षा उत्तीर्ण झाली. आता तिला चेन्नईच्या इंडियन आर्मी – अॉफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी) (OTA)मध्ये पुढील ट्रेनिंगसाठी जावे लागणार होते….

आता तिची द्विधा मनस्थिती झाली. एकीकडे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा , मॉडेलिंग करियर त्यातूनच पुढे बॉलिवूडमध्ये संधीची शक्यता…अन् दुसरीकडे लहानपणापासून मनाशी ठरवलेले भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न.

रात्रभर तीने विचार केला, पालकांनी निर्णय तिच्यावर सोपवला कोणत्याही निर्णामागे खंबीरपणाने आम्ही उभे राहू याची ग्वाही आई वडीलांनी तीला दिली आता गरिमा अजूनच गोंधळलेल्या अवस्थेत गेली.

मात्र सकाळी उठल्यावर निग्रहाने तिने आपला निर्णय आईला सांगितला. आता ती इटलीला न जाता चेन्नईला जाणार होती.भारतीय सैन्य दलाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी.

आणि तीने नुकतेच आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे व आता ती भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत आहे.

आज जेंव्हा अनेक तरूण तरूणी आपले उच्चशिक्षण सोडून बॉलिवूड किंवा जाहिरात किंवा सौंदर्य स्पर्धेतील झगमगटाला भुलून आपल्या करियरचा योग्य निर्णय घेवू शकत नाहीत त्या ठिकाणी लेफ्टिनेंट गरिमा यादवचा हा निर्णय अनेक जणांना एक प्रेरणा देणारा असेल की जो निर्णय घ्याल तो सर्वागीण विचार करून घ्यावा ज्या निर्णयावर तुम्हाला समाधान व गर्व वाटला पाहिजे.

न्यूज अनकट

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा