जुन्नर तालुक्यातील राजुरी येथिल शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

8

पुणे, ४ ऑगस्ट २०२३ : पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा सततचा वावर असतो. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांमध्ये ही भीती जास्त प्रमाणावर आहे. मागील काही महिन्यांमध्ये या भागात शेतकऱ्यांची जनावरे आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्याकडून अनेकदा हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. परंतु अजूनही परिसरात अनेक बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात बिबट्या विषयी दहशतीचे वातावरण पसरले आहे.

जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला करणारा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याने अनेक जनावरे आणि पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ले केले होते.बिबट्याच्या हल्ल्यात अनेक ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे या नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली होती. या भागात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता. या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.

जुन्नर परिसरात अनेक बिबटे आहेत. त्यामुळे एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी या परिसरात अन्य बिबटे गावात येऊन हल्ला करु शकतात, अशी भीती नागरिकांना तसेच वनविभागच्या कर्मचाऱ्यांनाही आहे. जुन्नर परिसरातील अनेक भागांत आणि शेतांमध्ये भर दिवसादेखील वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. सध्या शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम सुरू असुन शेतकरी आपल्या कामामध्ये मग्न असतात. अशावेळी बिबट्याची भीती मनात दहशत करून बसल्यामुळे नागरिकांची चिंता कायम राहते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा