भंडाऱ्याच्या गराडापार गावातील घटनेने नागरिकांमध्ये भीती
गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्यांवर मध्यरात्रीला बिबट्यानं हल्ला करून 10 शेळी आणि बकऱ्या ठार केल्यात. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी वनविभागा अंतर्गत येणाऱ्या गराडापार गावात घडली. या घटनेमुळे परिसरातील गावातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सुधाकर पंचभाई यांच्या या शेळ्या असून त्यांनी रात्रीला त्यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात त्या बांधलेल्या होत्या. रात्रीच्या सुमारास शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने पंचभाई हे गोठ्याकडे जात असताना त्यांना तिथे बिबट दिसला आणि त्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानं बिबट्यानं तिथून धूम ठोकली. पंचभाई यांचं यात हजारो रुपयांचे नुकसान झालं असून पवनी वन विभागानं त्यांना तातडीनं मदत करावी, अशी मागणी होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: नितीन कुथे












































