गोल पोस्ट इतर माहिती बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला, ओतूर हद्दीतील घटना

बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला, ओतूर हद्दीतील घटना

ओतूर, ३१ ऑगस्ट २०२३: ओतूर हद्दीतील अमिरघाट शिवारातून अहिनवेवाडी येथे दुचाकीवरून जात असताना, रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याने अचानक हल्ला करून दुचाकीस्वाराच्या मांडीवर पंजा मारल्याने एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली आहे. अमोल वसंत टिकेकर (वय ४५. रा. अमिरघाट ओतूर) असे जखमींचे नाव आहे.

ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सारणी फाटा येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी अमोल टिकेकर यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केले आहेत. दरम्यान ओतूर व परिसरात बिबट्याची संख्या वाढती असल्याने रात्रीच्या सुमारास वावरताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांने सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवक

error: Content is protected !!
Exit mobile version