वाघोली, दि. ३ जुलै २०२०: दि. ३ जुलै २०२० रोजी आवळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य शरद आवळे यांच्या शेता शेजारील शेतात बिबट्याच्या पावलाच्या खुणा दिसून आल्यामुळे आजूबाजूला भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे यांनी वन विभागाला कळवल्यानंतर वनसंरक्षक पी. एस. वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या पावलांच्या खुणा असल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून मागील काही दिवसांपूर्वीच मांजरी – कोलवडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. वन विभागाच्या वतीने मांजरी आवळवाडी शिवेवर पिंजरा लावण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास आवळवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे शेतात गेले असता त्यांच्या शेताला लागूनच असणाऱ्या शेतात बिबट्याच्या पावलांच्या खुणा दिसून आल्या व आव्हाळे यांनी तात्काळ वन विभागाला संपर्क करून माहिती दिली.
माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे वनसंरक्षक बी.एस. वायकर यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे बिबट्याच्या पावलांच्या खुणा आढळून आल्याने वनसंरक्षण वायकर यांनी आवळवाडी व परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे, पोलीस पाटील उमेश आव्हाळे, माणिक आव्हाळे, संदीप जावळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे