४०० सोडा, मुंब्र्यात धर्मांतर झालेली चार नावं तरी दाखवा – जितेंद्र आव्हाड

मुंबई, ९ जून २०२३ : ऑनलाइन गेमिंग अॅपद्वारे ४०० मुलांचे धर्मांतर झाल्याचा दावा गाझियाबाद पोलिसांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाशी गाझियाबादचे मुंब्रा कनेक्शन आहे. या दाव्याबाबत मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. युपी किंवा ठाणे पोलिसांकडून ४०० ऐवजी चारच धर्मांतरे सिद्ध करता येतील, मग राजकारण सोडू, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय या दाव्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी १ जुलै रोजी मुंब्रा बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

अशा निराधार गोष्टी पसरवून शहराची बदनामी केली जात असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी स्वस्तात राजकारण केले जात आहे. मुंब्य्राचे नाव घेऊन संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जातीयवादाचे विष पसरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्राच्या महासंचालकांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड नाराजीच्या स्वरात म्हणाले की, कोणतेही अधिकारी काहीही बोलत असले, तरी त्यांचे म्हणणे ठाणे पोलिसांनी फेटाळून लावले पाहिजे. महाराष्ट्राच्या निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक किती खालच्या पातळीवर जाऊन बसणार आहेत? महाराष्ट्राचे डीजीपी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी हे आरोप खोटे आहेत असेच म्हणावे. अन्यथा १ जुलै रोजी मुंब्रा बंद राहील. मुंब्य्रात सर्व धर्म आणि जातीचे लोक शांततेने राहत आहेत. त्यांची बदनामी करू नका. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा