जाणून घेऊ कार स्क्रॅपिंग पॉलीसी नक्की कशी आहे

येत्या 1 एप्रिल 2021 पासून कार स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांदरम्यान चर्चा होऊन निर्णयघेतला जाणार आहे. या धोरणानुसार 15 वर्ष जुनी वाहने वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे.दरम्यान लोकांच्या खाजगी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी

ही पॉलिसी लागू होईल? खासगी वाहनांसाठी काही वेगळे नियम असतील? खरंच 15 वर्ष जुनी वाहने डोकेदुखी ठरू शकतील, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊयात…जुन्या गाड्यांसाठी ऑटोमेटेड फिटनेस सेंटर :आपल्या खासगी गाड्यांना 20 वर्षांच्या वापरानंतर या सेंटरमध्ये जावे लागणार आहे. खासगी वाहनांना 20 वर्षांनी तर व्यावसायिक वाहनांना 15 वर्षांनी ऑटोमेटेड सेंटरमध्येदाखल करावे लागणार आहे. याचा उद्देश जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवण्याचा आहे.

इतर राज्यात हस्तांतरीतचा पर्याय आहे का? : जर तुमचे वाहन 15 वर्षांपेक्षा जुने असेल तर या वाहनाचे नजीकच्या राज्यात जाऊन रि-रजिस्ट्रेशन करणे शक्य आहे. परंतु, ही फार किचकट प्रक्रिया आहे. कारच्या आरसीची मुदत संपण्यापूर्वी हे रजिस्ट्रेशन होणे आवश्यक आहे. अधिक नियम, अटी आणि शर्ती तसेच दोन राज्यांमधील आरटीओ यंत्रणेशी संबंधित ही प्रक्रिया अधिकच डोकेदुखी ठरू शकते. कार स्क्रॅपिंग म्हणजे काय? : जर तुम्हाला तुमची जुनी

कार दुसऱ्या राज्यात नेत रि-रजिस्टर करायची नसेल, तर तुमच्यापुढे स्क्रॅपिंग हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये कारचा प्रत्येक भाग सुटा करुन तो रिसायकल केला जातो. यामुळे जुन्या कारचा अवैध किंवा गुन्हासाठी वापर होण्याची शक्यता संपुष्टात येते.
कार स्क्रॅप करण्यापूर्वी खालील सावधगिरी बाळगणे

आवश्यक:
• कार अधिकृत डिलरकडेच स्क्रॅप करा. यावेळी चेसिस क्रमांक घ्या.
• यावेळी डिलरने पर्यावरणीय दृष्टीने सुरक्षितता राखतस्क्रॅपिंग करणे आवश्यक आहे.आरटीओला कार स्क्रॅपिंगबाबत माहिती द्यावी, आणि काररि-रजिस्टर करुन घ्या.अशी होते कार स्कॅप:
• स्क्रॅप डिलर कारची स्थिती आणि वजनानुसार किंमतठरवतो.
• करार झाल्यानंतर डिलर कारचे सर्व भाग सुटे करतो.त्यातील प्लॅस्टिक, रबर आणि लोखंडाची विक्री करतो. जर कारमध्ये सीएनजी किट असेल, तर ते विशिष्ट पध्दतीने नष्ट
केले जाते.
• वरील सर्व प्रक्रियेनंतर आपली कार पूर्णपणे नष्ट झाली आहे का नाही याची खात्री कारमालकाने करणे आवश्यक
आहे.

 

लक्षात ठेवा:
• स्क्रॅप डिलरला ओरिजिनल आरसी (RC) देण्याची गरज नाही.
• आरटीओमधील पुढील प्रक्रियेकरिता कार स्क्रॅप करतानाचा फोटो आवश्यक असतो, तो घेऊन ठेवा.
• स्क्रॅपनंतर स्पेअरपार्टसच्या माध्यमातून डिलरला मोठा फायदा होऊ शकतो, त्यामुळे व्हॅल्युएशन करताना सावधगिरी
बाळगा.
•कार स्क्रॅप करताना आरटीओच्या नियमांचे पालन करावे.कार स्क्रॅपनंतर रजिस्ट्रेशनचे काय होते? : कार स्क्रॅपिंगची प्रक्रिया पूर्ण झाले कि, रि-रजिस्ट्रेशन होते. तेव्हा तो रजिस्ट्रेशन क्रमांक फ्रि होतो. या क्रमांकाचा उपयोग भविष्यात अन्य वाहनाच्या रजिस्ट्रेशनसाठी केला जातो.ताईच कार स्क्रॅप करताना संबंधित विमा कंपनीला माहिती देणेही आवश्यक असते.

सरकारचा काय विचार सुरु आहे? :
• अनुदान किंवा नुकसानभरपाईबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, मंत्रालय जुन्या वाहनांवर कर
लागू करु शकते.
• जुन्या वाहनांच्या स्क्रॅप धोरणामुळे प्रदुषण 25 टक्क्यांनी कमी होईल, तसेच इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल,
असा अंदाज आहे. दुसरीकडे स्क्रैप पॉलिसीत खासगी वाहनांवरील कर वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. जुनी वाहने रस्त्यावर येऊ नयेत यासाठी त्यावर ग्रीन टॅक्स लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.
• अशात खासगी वाहनमालकांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. 15 वर्ष जुन्या वाहनांवर कर रोड टॅक्सच्या तुलनेत 50 टक्के अधिक असू शकतो

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा