पुणे, १९ : महाराष्ट्राची प्रवासवाहिनी म्हणजेच एसटी. कोरोनाच्या लाटेत तडा गेला आणि वाहिनी कोसळली. पण आता एसटीला पुन्हा या तोट्यातून बाहेर काढणं गरजेच आहे, असे मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केलं. महामंडळाच्या दापोडी येथील कार्यशाळेची पाहणी करण्यासाठी ते आले होते.
यावेळी बोलताना त्यांना सांगितले की, लाल परी आता कोसळली आहे. कोरोनाच्या लाटेमुळे एसटीचे नुकसान झाले असून आता तिला पूर्वपदावर आणणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत असलेल्या सर्व शिक्षण घेणाऱ्या मोटर वाहक निरिक्षक महिलांच्या पहिल्या तुकडीला त्यांनी संबोधित केले. कार्यशाळेतल्या कामांची त्यांनी पाहणी केली. तसेच कामांची दुरुस्ती , कामात येणारे अडथळे यांसदर्भात चर्चा केली. आपण अवैध वाहतूक रोखली तर एसटीला चांगले दिवस येतील, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अनिल परब यांचा सत्कार करण्यात आला.
न्युज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस