पुणे, ३१ डिसेंबर २०२०: आज आपण २०२० मधील फ्लॅशबॅक मधे जाणार आहोत. जिथे देशभरात या वर्षात काय काय घडले हे जाणून घेणार आहोत.
जानेवारी : २०२०
भारतात पहिला कोरोना रूग्ण आढळला. वुहानमधून आलेल्या एका मेडिकलच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती.
इस्त्रोकडून “चंद्रायन 3” ला मोहिमेला सरकार कडून मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली होती.
फेब्रुवारी : २०२०
दिल्लीत पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले.अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री झाले.
वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथील नांदेरी चौकात एका तरूणीवर पेट्रोल ओतून जिंवत जाळण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते.
मार्च : २०२०
देशात १० बँकांच्या ४ बँका करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.
२५ मार्चपासून देशात पहिला २१ दिवसांचा कर्फ्यु लागू करण्यात आला.
एप्रिल : २०२०
१६ एप्रिलला पालघर साधु हत्याकांडात दोन साधूंसह तिघांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती.
दिग्गज अभिनेते इरफान खान आणि ॠषी कपूर यांचे मुंबईत निधन.
मे : २०२०
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले.
पश्चिम बंगालमधे अम्फान चक्रीवादळ आले. यात ११८ जणांचा मृत्यू झाला.तर लाखो घरांना फटका बसला.हजारो घरांचे नुकसान झाले.
जून : २०२०
१४ जून ला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली.
भारत चीन सैनिकांमधे संघर्ष झाला ज्या मधे भारताचे २० जवान शहीद झाले.भारतीय सैनिकांनीही अनेक चीनी सैनिकांचा खात्मा केला.
याच महिन्या मोदी सरकारने टिकटाॅक सह चीनच्या ५९ ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
जुलै : २०२०
सोन्याच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली.प्रती १० ग्रॅमसाठी ५५ हजार दर मोजावे लागत होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४३ व्या ऑनलाईन वार्षिक सभेत सीएमडी मुकेश अंबानी यांनी 5G ची घोषणा केली.
ऑगस्ट : २०२०
१५ ऑगस्ट रोजी भारतीय खेळाडू महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
३१ ऑगस्ट रोजी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले.
सप्टेंबर : २०२०
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स कनेक्शन मधे ९ तारखेला रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली.
बाबरी विध्वंस प्रकरणात लालकृष्ण अडवाणी यांचा सह ३२ जणांची ३० सप्टेंबर रोजी निर्दोष मुक्तता.
ऑक्टोबर : २०२०
चंद्रावर पाणी सापडल्याचा नासाने दावा गेला.
भाजपचे दिग्गज नेते समजले जाणारे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केला.
नोव्हेंबर : २०२०
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी ला ४ तारखेला अटक करण्यात आली.
मुंबई इंडियन्स ने दिल्ली कॅपिटलचा पराभव आयपीएल स्पर्धा १० तारखेला जिंकली होती.
डिसेंबर : २०२०
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन तर्फे “ग्लोबल टीचर प्राईज”सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी जाहीर झाला.पुरस्काराचे मानधन ७ कोटी होते.
आर्या राजेंद्रन देशातील सर्वात तरुण महापौर बनल्या.२१ वर्षीय आर्या यांची तिरूवतंपुरम महापालिकेच्या महापौर म्हणून निवड झाली.
२८ डिसेंबर रोजी दिल्लीत पहिली चालक विरहित मेट्रो धावली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव