महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून पाठवण्यात येतील मुख्यमंत्र्यांना पत्र: जिल्हाध्यक्ष नितीन काळे

उस्मानाबाद, १३ ऑगस्ट २०२०: दूध दरवाढीच्या या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी आता मात्र आक्रमक झालेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातून पाच लाख शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यात येणार आहेत. हे पत्र पाठवण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केलेले आहे.

देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान देण्यात आले होते आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यात आले होते. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आजतागायत कोणत्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही. यामुळे, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप महायुतीच्या वतीने १ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण राज्यभरात महादूध एल्गार आंदोलन करण्यात आले होते.

आता जिल्ह्यात हे दूध आंदोलन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र करण्याचा निर्णय भाजपा महायुतीने घेतलेला आहे. या आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून महाराष्ट्रातील ५ लाख दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र रूपी निवेदन पाठवणार आहेत.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी १३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. तरी, या वेळी शेतकऱ्यांनी गाईच्या दुधाला ३० रूपये दुधाला प्रतिलिटर दर व १० रुपये अनुदान आणि भुकटीला ५० रूपये अनुदान द्यावे , अशी मागणी पत्रामध्ये करावी असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा