पगार मिळाला नाही म्हणून संपवले जीवन..

भोसरी (पुणे), १० जुलै २०२० : पगार न मिळाल्या मुळे सुपरवायझर ने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बांधकाम साईटवर ठेकेदाराने पगार दिला नाही म्हणून काम करणाऱ्या सुपरवायझरने आपले आयुष्य संपावायचा हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसते. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सी. एम. ई.) च्या परिसरामध्ये ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

गळफास घेऊन मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव रवींद्र सिंग असे आहे. रवींद्र सिंग हे सी.एम.ई. येथे बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याने गुरुवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. पोलिसांना तपासाच्या दरम्यान घटना स्थळी त्याची चिट्ठी सापडली आहे. त्या चिट्ठीत ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करत असल्याचे उल्लेखले आहे. रवींद्र सिंग च्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. या प्रकरणाची पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशन मधील आधिकारी करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा