गोल पोस्ट महाराष्ट्र अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट बंद, रुग्णांचे हाल

अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट बंद, रुग्णांचे हाल

अमरावती ७ ऑगस्ट २०२४ : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्णांच्या सेवेकरिता असलेली लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना नाहक त्रास होताना दिसत आहे. सदर लिफ्ट तीन महिन्यापासून बंद असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली असून या संदर्भात अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी, फोनवरून कार्यकारी अभियंत्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांना सांगितले की, रुग्णालयामधील लिफ्ट सुरू आहे. परंतु सत्यता पडताळली असता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दोन्हीही लिफ्ट बंद पडल्या होत्या.

यावर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, लिफ्ट जुनी असल्यामुळे अनेकदा बंद पडते. आम्ही आता येथे मेडिकल कॉलेज सुरू करत आहोत, त्यामुळे दोन नवीन लिफ्टचे प्रस्ताव दिले आहेत. सर्व परिस्थितीवरून जिल्हा रूग्णालयात अंधाधुंद कारभार सुरू असल्याचे दिसून आले.

न्युज अनकट प्रतिनीधी : सागर डोंगरे

error: Content is protected !!
Exit mobile version