पुण्यात पुढचे काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, जाणून घ्या धरणांतील उपयुक्त पाणीसाठा

पुणे, 2 जुलै 2022: राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असला तरी पुण्यात मात्र पावसाने चिंता वाढवली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळं आता 4 जुलैपासून पाणी कपातीची घोषणा महानगरपालिके कडून करण्यात आलीय. असं असताना आता पुणेकरांसाठी हवामान खात्याकडून थोडी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याची सुरुवात पुण्यासाठी पावसाने होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 7 ते 8 जुलै पर्यंत पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे एनडीए भागात गेल्या 24 तासात 1.8 सेमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलीय. तर पुणे शहरात गेल्या 24 तासात 7.8 आणि पाषाण भागात 10.1 सेमी पावसाची नोंद करण्यात आलीय. पुढील काही दिवस पुण्यातील वातावरण ढगाळ राहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

धरणातील उपयुक्त पाणीसाठा

1 जुलै च्या माहितीनुसार पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण्यात 21.39 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हाच पाणीसाठा मागच्या वर्षी 44.5 टक्के इतका होता. पवना धरणामध्ये 1 जुलै पर्यंत असलेला उपयुक्त पाणीसाठा 13.03 टक्के इतका आहे तर गतवर्षी हा साठा 30.63 टक्के इतका होता. तर टेमघर मध्ये उपयुक्त पाणीसाठा 0 आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा