भंडाऱ्यामध्ये वीज कोसळली, २२ मजूर थोडक्यात बचावले

भंडारा, २१ जुलै २०२३ : पवनु तालुक्यातील चिचाळ गावालगतच्या चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने २२ शेतमजुरांची प्रकृती अस्वस्थ झाली. मजूरांवर अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी रोवणी हंगामाला धडाक्यात सुरुवात झाली.

दरम्यान अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने २२ मजूरांवर प्रकृती अस्वास्थ्यतेची वेळ आली. देव बलवत्तर म्हणून ते सर्वजण थोडक्यात बचावले आहे. घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाऊन पंचनामा केला आहे.

मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथे आज सकाळी वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या पाच महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी तीन महिलांवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर दोन महिलांवर तुमसर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा