Mumbai Lilavati Hospital: मुंबईमधील विख्यात व प्रसिद्ध लिलावती रुग्णालयात माजी ट्रस्टींवर १२५० कोटींच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रस्टच्या १७ जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. यासंदर्भातील माहिती लिलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परबीर सिंग यांनी दिली. यावेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. ती म्हणजे लिलावती रुग्णालयात काळी जादू केली जाते. मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते बोलत होते. मुंबईमधील प्रसिद्ध असेलेल्या रुग्णालयात अशा घटना घडतात ही बाब चिंता करण्यासारखी आहे.
काय म्हणाले परबीर सिंग
काळ्या जादूच्या प्रयोगावर परमबीर सिंग म्हणाले, ट्रस्टच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी अशी तक्रार केली होती की माजी ट्रस्टी प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता कार्यालयाच्या बाहेर येऊन बसून काळी जादू करतात. ऑफिसचा मजला खोदला असता आम्हाला मानवी अवशेष, तांदूळ,मानवी केस आणि इतर काळ्या जादूच्या साहित्याने भरलेली आठ भांडी आढळली. आता मॅजिस्ट्रेट स्वतः बीएनएसएसच्या कलम २२८ अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहेत”, असं माजी पोलीस आयुक्त म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर