दबावा शिवाय जगा असे आनंदी जीवन……

पुणे, २७ जानेवारी २०२१: हल्ली च्या आधुनिक काळात मानवाचे आयुमान कमी झाले आहे. त्यामध्ये त्याचे आयुष्य तो फार अडचणीत जगत असतो आणि त्याचा एकंदरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पण, या कडे आपण गांभीर्याने लक्ष घालत नाही. खाणंपिणं राहणं हे आजचे फार वेगळे झाले आहे. ज्यामुळे आयुष्य फार कठीण जगत आसल्याचा आभास सारखा आपल्याला होत आसतो.

असं कठीण वाटण्याचे कारण म्हणजे आपले राहणीमान होय. ऑफिस टाईमिंग तसेच अवेळी खाणे, झोपणे या सर्वच गोष्टी आपले आयुष्य जगण्यासाठी फार महत्वाच्या आहेत. तर आज तेच आनंदी कसे जगायचे यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे आपण आनंदी आणि निरोगी कसे रहाल यासाठी आहे.

हे करून पहा नक्कीच चांगला परिणाम मिळेल….

कोणतीही गोष्ट चांगली आहे की वाईट असा निष्कर्ष काढू नका.

आयुष्यात परिवर्तन महत्वाचा म्हणून “परिवर्तन होणारच” हे स्विकारले तर पुढे जाणे कठीण होणार नाही.

कुठल्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टाहास नको. काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्यास त्यातही समाधानी राहणं शिका.

इतरांची बोलणी ऐकणं सहन करा त्या वागणुकीचा मनस्ताप करून घेण्यापेक्षा समोरच्याला क्षमा करा.

भावनांतून शिकण्याला प्राधान्य द्या.

या काही गोष्टी तुम्ही आयुष्यात अवलंबून घेतल्या तर बदल हा नक्कीच होईल आणि तुम्ही नेहमी आनंदी रहाल. तसेच नेहमी नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा तुम्हाला जास्त मिळेल त्यामुळे नक्की एकदा हे बदल करून पहा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा