जालना, १३ जानेवारी २०२४ : अवैधरीत्या तलवार बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून तीन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. जालना शहरातील फुकटनगर आणि इंदिरा नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. त्यानुसार तपास करत असताना शहरातील फुकटनगर आणि इंदिरानगर परिसरात दोघे जण तलवार बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने कारवाई करून सादत खान हसद खान (रा. फुकटनगर) याच्या ताब्यातून दोन व हैदरशहा नवाब शहा (रा. इंदिरानगर जालना) याच्या ताब्यातून एक अशा तीन तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात कदीम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी