तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी मुंबईतील लोकल सेवा झाली विस्कळीत, ९० गाड्या रद्द तर २२० उशीरा

मुंबई १४ जून २०२३: मुंबई लोकल ट्रेन सेवा काल मंगळवारी विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे, पाच वाजेपर्यंत ९० हून अधिक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर २२० गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. मालाड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही समस्या झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान मंगळवारी दुपारी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावर लोकल गाड्या ठप्प झाल्या. बोरिवली ते चर्चगेट आणि चर्चगेट ते बोरिवली या गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यामुळे स्थानकांवर गर्दी वाढतच गेली.

या मार्गावरील सगळ्याच स्थानकांवर ऑफिसमधून सुटल्यावर येणाऱ्या लोकांची गर्दी होत होती. गर्दीच्या वेळेत ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांचा संताप वाढला होता.दुपारपासून तांत्रिक बिघाडामुळे गाड्यांना उशीर होऊ लागला आणि सायंकाळपर्यंत परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. अनेक स्थानकांवर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटले जाते. पण अनेक गाड्या रद्द झाल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे मुंबईत ही गरज किती मोठी आहे, याची प्रचीती आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा