गोल पोस्ट स्पॉटलाइट नाटक लाॅकडाऊनमधेही नाट्यरसिकांचे मनोरंजन होत आहे क्वाॅरंटाईन थिऐटरच्या माध्यमातून

लाॅकडाऊनमधेही नाट्यरसिकांचे मनोरंजन होत आहे क्वाॅरंटाईन थिऐटरच्या माध्यमातून

सध्या राज्यात कडकडीत लाॅकडाऊन आहे. त्यामुळे घरी राहून अनेकजण वाचन, पाककला, गाणी असे विविध उपक्रम राबवत आहेत. मात्र यामधे काही असेही आहेत की ज्यांना घरी राहून कंटाळा आला आहे. अशा लोकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी, कल्याणमधील अभिजीत झुंझारराव यांनी आपल्या ‘अभिनय कल्याण’ या संस्थेच्या वतीने, ‘होम क्वाॅरंनटाईन थिऐटर’ असा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येकजण काही ना काही उपक्रम या लाॅकडाऊनच्या काळात करत आहे, त्याप्रमाणेच अभिजित झुंझारराव हेही, कलेशी प्रामाणिक राहून हा संकल्प राबवताना दिसत आहेत.

यामधे नाटक वेब सिरीज, कथा, कविता, चित्रपट, अशा विविध कलांचे सादरीकरण केले जाते. दररोज सायंकाळी ५ वाजता, फेसबुकवर याचे प्रक्षेपण केले जाते. नुकतेच या क्वाॅरंटाईन थिएटरचे रौप्यमहोत्सवी २५ भाग पार पडले. लाॅकडाऊन जोपर्यंत असेल तो पर्यंत हे थिएटर चालू राहणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व कलाकार घरी राहून हे काम करत आहेत. नाट्य रसिकांबरोबरच अनेक दिग्गजांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version